वर लागणारी सर्व दस्तावेज documents असल्यास xerox attached करून जोडावी.
जातपडताळणी साठी आवश्यक कागदपत्रे
१) पासपोर्ट साईज फोटो २
२) inst /confermation letter – (अर्जदार प्रवेश D T E )
३) अर्जदार यांचा जन्म दाखला
४) अर्जदार यांचा जातीचा दाखला.
५) प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला . अर्जदार यांचा जन्माचा दाखला /पुरावा.
६) पुरावे असल्यास -चुलता /चुलती/आजोबा/पणजोबा/खा.पणजोबा यांचा प्रार्थमिक शाळा सोडल्याचा दाखला, शाळेच्या नोंदवहीचा उतारा, गाव नमुना नंबर १४ चा उतारा. ( तहसील रेकॉर्ड )
७) अर्जदार यांचे वडील, चुलते, चुलती,आजोबा,पणजोबा,खा.पणजोबा यांचे जातप्रमाणपत्र (असल्यास )
८) अर्जदार यांच्या रक्तनातेतील जातप्रमाणपत्र
(चुलता /चुलती/लहान-मोठे भाऊ बहीण )
९) अर्जदार यांचे वंशावळीचे शपथपत्र/प्रतिज्ञापत्र
१०) इतर पुरावे – शाळा प्रवेश निर्गम उतारा, ७/१२ उतारा, वारसनोंद गाव नमुना, वाटणीपत्र, फेरफारनोंद इत्यादी. (सर्व तहसील रेकॉर्ड नुसार )
टीप – वरील संबंधित कागदपत्रांत अर्जदाराचे वडील ,चुलत,चुलती,यांचा दाखल तसेच आजोबा,पणजोबा,खा.पणजोबा अ सेल तर वंशावळ बनवताना वंशावळीत नमूद करावे. नसल्यास नाही.
ब } दुय्यम महत्वाचे पुरावे. –
१) अर्जदाराकडे प्राथमिक प्रत नसल्यास दुय्यम प्रत जोडणे.
२) वडील ,चुलत,चुलती,आजोबा,पणजोबा, खा.पणजोबा यांचा जन्म /मृत्यु नोंदवही उतारा ( यालाच गाव नमुना १४ ) असे म्हणतात. सदर दाखला तहसीलदार साहोब यांच्याकडे मिळतो.
किंवा
जर वर दिलेल्या कागदपत्रांत जातीचा पुरावयाचा उल्लेख नसेल तर त्याच्यात महसूल दस्तावेज, जुने खरेदीखत , विक्रीखत, ( sale deed ) ज्यात जातीचा उल्लेख असेल.
३) अर्जदाराचे जात प्रमाणपत्र व अन्य पुरावे /दस्तावेज.
सदर पुरावे जोडण्यासाठी संबंधित महत्वाची सूचना
१) OBC – (इतर मागासवर्गीय ) असल्यास सॅन १९६७ पूर्वीचे पुरावे. कुणबी असल्यास जाती साठी सन १९२० नंतरचे पुरावे. व १९६७ पूर्वीचे पुरावे जोडावे. .
२) SC – ( अनुसूचित जाती ) असल्यास सन १९५० पूर्वीचे पुरावे. जोडावे.
३) VJ /N T – ( असल्यास ) सन १९६१ पूर्वीचे पुरावे जोडावे.
४) SBC – ( असल्यास ) – विशेष प्रवर्गातील सन १९५५ पूर्वीचे पुरावे जोडावे.
लक्षात ठेवा : जे वंशावळ बनवतील त्यात त्याचे कागदपत्रे सोबत असेल आणि जात पडताळणी झाली असेल / असतील तरच सदर व्यक्तीचे नाव वंशावळीत तसेच तयार करत असलेल्या प्रतिज्ञापत्रात लिखाण करा अन्यथा नाही.
मजकूर /मसुदा तुम्हांला दिलेला आहे. १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर मसुदा आणा. त्याला ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट चिकटवा. व आपल्या अधिकाऱ्या समक्ष साक्षांकित करा
Showing all 5 results