Loading

लेख शेत जमीन वाटपपत्र

महाराष्ट्रात “महाराष्ट्र महसुल अधिनियम 85 नुसार जमीन हस्तांतरणाची प्रक्रीया चालते, एका कुटुंबातील रक्ताच्या नात्यामंध्ये म्हणजेच वडीलांकडुन मुलाकडे अथवा वडीलांकडुन मुलीकडे जमीन हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क हा भरावा लागत होता, मात्र आता या रक्ताच्या नात्यात जमीन हस्तांतरण करत असतांनी आता मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता राहणार नाही, आता फक्त 100 रूपयाच्या स्टॅम्प पेपरवरती जमीन हस्तांतरणाचे वाटणीपत्र आता करता येणार आहे, त्यासाठी शासनाकडुन याआधी एक GR सुध्दा काढण्यात आलेला आहे, त्या GR नुसार तहसीलदारांना महाराष्ट्र महसुल अधिनियम 85 नुसार वाटणीपत्र करण्याचे निर्देश दिलेले आहे, त्यामुळे हिंदु कुटुंब पध्दतीनुसार एकाच कुटुंबातील रक्ताच्या नात्यामंध्ये जमीन हस्तांतरण करण्यासाठी याचा लाभ निश्चितच होणार आहे.

वाटपपत्र हे – वडील आणि मुलगा, आई – मुलगा, पती – पत्नी – मुलगी, बहीण – बहीण , भावा – भावात, होऊ शकते तसेच बऱ्याचदा हे वाटप पत्र सासरा आणि सून ह्याच्यात पण होऊ शकते परंतु त्याची लिखाण शैली वेगळी असते.

वाटपपत्राचे संपूर्ण लिखाण आणि त्याची शब्द रचना आपल्याला साइटद्वारे कळेलच सोबत दोन नात्यांमध्ये वाटपपत्र करताना वाक्यात, विषयात, आणि लिखाणात बदल असतोच हे हि लक्षात घेणे तेवढेच महत्वाचे असते. हे समजणे अधिक महत्वाचे असते

वाटपपत्र करणे साठी पुढील चारही जसे – वाटपपत्र अर्ज, तहसीलदार अर्ज , आणि जबाब सोबत नोटरी ऍफिडेव्हिट कागदपत्रे (दस्तावेज) लिखाण करणे गरजेचे आहे. संबंधित वाटणीपत्राचे पूर्व मसुदा आपल्याला साइटवर बघायला मिळेल. आपण पूर्व मसुदा डाउनलोड करून आपले वाटप पत्र स्टॅम्प पेपर वर मुद्रित, तयार करू शकता….

No products were found matching your selection.