तुम्हाला शैक्षणिक कामासाठी किंवा शासकीय कामासाठी / नोकरीसाठी /इतर कामासाठी तुम्हांला जातीच्या दाखल्याची आवश्यकता आहे म्हणून तुम्ही जातीचा दाखला पडताळणी साठी हे प्रतिज्ञापत्र मे. कार्यकारी दंडाधिकारी साहेब यांना करून द्यावयाचे आहे.
सोबत ज्या ज्या कागदपत्रांत तुमची जात नमूद केलेली आहे ते कागदपत्रे प्रतिज्ञापत्राला जोडा
जात उदाहरणार्थ
तुम्ही , हिंदु – भिल्ल , हिंदु – महार, हिंदू- ब्राह्माण , हिंदु -साळी , हिंदु -माळी इतर
कुठल्याही जातीचे असाल. त्याप्रमाणे आपळी जात प्रतिज्ञापत्रात नमूद करून आपले प्रतिज्ञापत्र तयार करू शकतात.
सदर आपल्याकडे असणारे आपले वरिष्ठ आई, वडील , भाऊ , बहीण, त्यांची मुले बाळे इतर ज्याच्या ज्यांच्या जात प्रमाणपत्रात हिंदु – xyz जात लागलेली असेल ते कागदपत्रे तुमच्या जात पडताळणी प्रतिज्ञापत्राला जोडा जेणेकरून तुम्हाला पाहिजे असणारे जात पडताळणी पत्र संबंधित अधिकाऱ्याकडून सुखसंकीत करून भेटेल व तुमचे कार्य पूर्ण होईल.
वंशावळ तयार करा डेमो मजकुरात दिलेला आहे.
लक्षात ठेवा : जे वंशावळ बनवतील त्यात त्याचे कागदपत्रे सोबत असेल आणि जात पडताळणी झाली असेल / असतील तरच सदर व्यक्तीचे नाव वंशावळीत तसेच तयार करत असलेल्या प्रतिज्ञापत्रात लिखाण करा अन्यथा नाही.
त्यात सदर मजकूर /मसुदा तुम्हांला दिलेला आहे. १०० रुपयांच्या बॉण्ड पेपर वर सदर मसुदा आणा त्याला ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट चिकटवा व आपल्या अधिकाऱ्या समक्ष साक्षांकित करा