ग्रामपंचायत / नगरपरिषद / पंचायत सामिती / नगरपालिका / महानगरपालिका /जिल्हा परिषद येथील अनुसूचित जातीचे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील राखीव असलेल्या वार्ड क्रमांक /गट नंबर / प्रभाग क्रमांक टाकून अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावर निवडणूक लढवायची असल्यास सदर प्रतिज्ञापत्र मे .कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर उपस्थित राहून करून द्यायचे आहे.
दाव्या सामानार्थ पुढील कागदपत्रे जोडावयाची आहे. ज्यात /असल्यास
१. तहसीलदार/जिल्हाधिकारी/उप-अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र झेरॉक्स.
२. प्रार्थमिक/ माध्यमिक दाखला
३. जन्म दाखला
४. वडिलांच्या मृत्यूचा दाखला
५. असल्यास चुलते /आजोबा / आत्या मृत्यूचा दाखला .
६. जन्माचे उतारे ज्यामध्ये जातीचा उल्लेख
७. जाती विषयक इतर महसूल पुरावे.
८. महाराष्ट्रातील कायम रहिवासी असल्यासचा पुरावे.
इतर
तयार मसुदा दिलेला आहे त्याचा वापर करून गाळलेल्या जागा भरा .आपले कार्य करा.