तुमचे लग्न झालेले आहे. तुमच्या माहेरचे नाव शीतल पंडित महाजन होते. तुमचे लग्न मनोज कुमार जोशी झाले असल्याकारणाने लग्नानंतर तुमच्या नावात बदल होऊन सौ. शीतल मनोज कुमार जोशी असे झालेले आहे.
तरी आता माहेरचे नाव कुमारी. शीतल पंडित महाजन व सासरचे नाव सौ. शीतल मनोज कुमार जोशी ह्या वेगवेगळ्या व्यक्ती नसुन एकच व्यक्ती आहे. असे प्रतिज्ञापत्र तुम्हाला पंचायत समिती/ नगरपालिका,/ नगरपरिषद/महानगरपालिका/ कामासाठी/ नोकरीसाठी करून द्यावयाचे आहे .
लग्नानंतर नावात बदल किंवा सदर व्यक्ती एकच नावाची आहे मसुदा तुम्हाला दिलेला आहे. १०० रुपयांच्या स्टँम्प पेपरवर मसुदा लिखाण करून ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट लावून सदर मसुदा वर आपल्या दंडाधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्या आपले कार्य करा. हे सोपे आहे.