दोन गाड्यांमध्ये अचानक एखादी दुर्घटना झाली असेल. आणि त्या दोन व्यक्तीमधून एखादी व्यक्ती जेव्हा समोरील व्यक्तीवर गुन्हा नोंद करते. त्यांच्यात वादविवाद होऊ नये किंवा आपापसांत हाणामारी होऊ नये. यासाठी सदर पोलीस स्टेशन समजूतपत्र दोन्ही व्यक्तीमध्ये केले जाते.
ज्याला इजा झाली ज्याने गुन्हा दाखल केला तो लिहून घेणार पार्टी नंबर
( १ ) असतो.
त्यात ज्याच्याकडून कृत्य घडते तो लिहून देणार पार्टी नंबर ( २ ) असतो.
सदर लिखानातं समजूतपत्र लिहून देणार याने करून द्यावयाचे असते. त्यात नेमकी ऍक्सीडेन्ट कसा झाला ? याची सविस्तर माहिती लिहून देणार्याने किंवा घेणाऱ्याने कागदोपत्री तयार करून द्यावयाची असते.
पोलीस स्टेशन समजूतपत्र करारनामा नमुना/मसुदा प्रदान केला आहे. तुमच्या गैर-न्यायिक स्टॅम्प पेपरवर – पोलीस स्टेशन समजूतपत्र करारनामा दिलेला आहे. तुमच्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी हे लेखन वापरा. कागदाची छपाई करा. आणि आपल्या सार्वजनिक पोलीस स्टेशन अधिकारी साहेबां समोर उभे रहा. आणि साक्षीदारासमोर स्टॅम्प पेपरवर अधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्या. तुम्ही पूर्ण केले…